फलटण नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २६ - : फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली असून यावेळी विविध विषय समितीच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या.अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी निखिल जाधव तर नगराध्यक्ष समशेसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सोमाशेठ जाधव, आरोग्य समिती सभापतीपदी सचिन अहिवळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती राहुल निंबाळकर, नियोजन व विकास समिती सभापतीपदी संदीप चोरमले, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सौ मोहिनी हेंद्रे तर मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापती पदी सौ सुपर्णा अहिवळे यांची निवड करण्यात आली. तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थायी समितीत नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न 'स्थायी समिती' अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर कामकाज पाहणार आहेत, तर सर्व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती हे या समितीचे पदसिद्ध 'सदस्य' असणार आहेत. याशिवाय, सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि शिवसेनेचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती : उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले (पदसिद्ध सभापती). स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : सचिन अहिवळे. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती : राहुल निंबाळकर. नियोजन व विकास समिती सभापती : संदिप चोरमले. महिला व बालकल्याण समिती : सभापती – सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, उपसभापती – सौ. कांचन दत्तराज व्हटकर. मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापती : सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.

No comments