Breaking News

फलटण नगर पालिकेत अनागोंदी कारभार ; स्वीकृतला स्थायी समितीत घेता येत नाही - अनुप शहा यांचा पक्षाला घरचा आहेर

Chaos reigns in Phaltan Municipality; Sankath cannot be included in the standing committee - Anup Shah is a party member

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - स्वीकृत नगरसेवकाला स्थायी समितीत नुयमानुसार घेता येत नसताना, नेतृत्वाची दिशाभूल करीत केवळ हट्टाने निवड केली असून, माझी कन्या कु. सिद्धाली हिला कोणत्याही पदाची आशा नाही व असणारही परंतु तिला शिक्षण व सांस्कृतिक समितीत घेतले मात्र तिने तिथंच ताबडतोब तडकाफडकी राजीनामा दिल्याचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी स्पष्ट केले.

    आज गुरुवार दि. 26 रोजी फलटण फलटण पालिका सर्व समिती निवडणुका बिनविरोध पार पडल्या यामध्ये भाजपच्या गोटात चांगलेच वाकयुद्ध पाहायला मिळाले,  स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव यांना स्थायी समितीत घेतल्याने अनुप शहा यांनी ही निवड अयोग्य असून, त्या विरोधात जिल्हाधिकारी अन वेळ पडली तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट करीत, नंदू पांडुची सत्ता घालवुन अंडू पांडुची सत्ता आणण्यासाठी तीस वर्षे संघर्ष केला नाही तर, या जनतेची सेवा करीत फलटण शहराचा सर्वांगीन विकास होण्यासाठी केला आहे. यामुळे या पुढे टक्केवारीच्या जाळ्यात पालिका अडकून  न देता, विकासाच्या दिशेने नेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा, चि. सिद्धांत शहा पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.

No comments