११ वर्षे बंद असलेल्या ५ टाक्या आम्ही १ महिन्यात सुरू करू! पाणीटंचाई संपवू - समशेरसिंह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - 5 पाण्याच्या टाक्या 11 वर्षे बांधून उभ्या आहेत, मात्र राजे गटाने त्या उपयोगात आणल्या नाहीत, आम्ही 1 महिन्याच्या आत या टाक्या कार्यान्वित करून शहराची पाणीटंचाई दूर करू, शहरातील जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, माझ्यासह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा विद्यमान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना, अनेक महिला भगिनींनी आपल्या व्यथा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढे मांडल्या, यावेळी खास करून अवेळी येणारे पिण्याचे पाणी, स्वच्छतेचा अभाव याचबरोबर रस्त्यांची झालेली दुरावस्था, या गोष्टी प्रामुख्याने समोर मांडल्या, त्याचबरोबर येथील माजी नगरसेवकांनी केव्हाही आम्हाला मूलभूत सुविधा देण्याबाबत कधीही पुढाकार घेतला नसल्याची खंत व्यक्त करीत समशेर दादा तुमच्याकडूनच या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, यामुळे आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष पदासह तुमचे सुशिक्षित व नेहमीच लोकसहभागातून शहराचा विकास करण्यासाठी उभे असलेले उमेदवार संदीप चोरमले अन् प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊ असा मतदारांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी युवानेते रणजितसिंह भोसले,तुकाराम शिंदे, यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments