Breaking News

फलटण नगर पालिकेवर भाजप-राष्ट्रवादीचा झेंडा ; रणजितसिंह किंगमेकर

BJP-NCP flag on Phaltan Municipality; Ranjit Singh Kingmaker

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गेली 35 वर्ष निर्विवाद सत्ता असलेली नगरपालिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अक्षरशः हिसकावून घेत श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव करीत आपले ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा दैदिप्यमान विजय संपादित करीत एक इतिहास रचला आहे.

    फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक  ७५४  मतांचे मताधिक्य घेत १६,४८९ मते मिळवत जिंकली आहे, तर शिवसेनेचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना १५,८८९ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी 918 मते नोटा ला मिळाली आहेत. दरम्यान 27 नगरसेवक असलेल्या फलटण पालिकेत 18 जागा जिंकल्या असून पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला तर शिवसेना राजेगटाला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय घोषित होताच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला.

    फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढत होऊन भाजपाने गेली 30 वर्षाची श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता उध्वस्त करीत श्रीमंत रामराजे यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ चिरंजीव तथा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू यांनी समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने अनिकेत राजांचा पराभव केला. 

    एकदा आमदारकीला आमदार पाडला आणि आता मुलगाच पाडला यामुळे माजी खासदार रणजीत निंबाळकर पुन्हा एकदा फलटणचे किंग मेकर ठरले आहेत.

    माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट बरोबर घेत लोकांपर्यंत विकासाचा वादा रणजीत दादा हे दाखवून देत फलटणकरांना विकास पाहिजे आणि तो करायचा असेल तर भाजपाला साथ द्या अशी भावनिक साथ त्यांनी घातली होती यामुळे फलटणकरांनी माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची सत्ता फलटण नगरपालिकेमध्ये निर्विवाद देत तब्बल 18 उमेदवार नगरसेवक पदाचे निवडून आले तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना फक्त आठ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

    आजपर्यंत नगरपालिका निवडणुकांमध्ये मलठण नेहमीच माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना साथ देत आले होते परंतु यावेळी फलटण शहरातील इतर सर्वच भागात मुसंडी मारीत मोठ्या मताधिक्याने आपले नगरसेवक निवडून आणले मलठणचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती अपवाद वगळता इतर सर्वच ठिकाणी भाजपावर राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्याने नगरसेवक निवडून आणले मलठण मध्ये भाजपाचे गटनेते अशोकराव जाधव यांचा माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी धक्कादायक असा पराभव केला. तसेच मलठण मध्ये किरण राऊत यांचा दीपक कुंभार यांचे विरुद्ध फक्त दोन मताने विजय झाला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज पवार यांनी भाजपाचे अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी धक्कादायक असा पराभव केला आहे.

    प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपा पुरस्कृत मैत्रीपूर्ण लढत झाली होती तसेच येथे शिवसेनेने तिसरा पर्याय दिला होता मात्र माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव यांनी आपल्यासह सोबतच्या उमेदवार अस्मिता ताई लोंढे यांना मोठ्या संख्येने निवडून आणले यामुळे या ठिकाणी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी चांगली मते मिळाली.

    प्रभाग क्रमांक दोन मध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाने सुपर्णा ताई सनी अहिवळे अन मीना जीवन काकडे या दोघींनी समोरच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव केला या ठिकाणी मात्र राजे गट तथा शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला असून अपक्ष उमेदवार सोनाली संग्राम अहिवळे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मागे टाकून अपक्ष दोन नंबरला राहिल्या या ठिकाणी बंडखोरी झाली नसती तर वेगळा निकाल निश्चित पाहायला मिळाला असता, प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा आणि शिवसेनेमध्ये थेट लढत झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादित केला त्याचबरोबर सोबतच्या भाजपाच्या उमेदवार सुलक्षणा सरगर याही निवडून आल्या आहेत.

    प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपा व राष्ट्रवादीला शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने चितपट करीत भाजपा व राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवारांचा पराभव केला यामधून पप्पू शेख व रूपालीताई सुरज जाधव यांनी शिवसेनेचा झेंडा फडकवला, प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी नगरसेवक दत्तराज हटकर यांच्या पत्नी कांचनताई दत्तराज व्हटकर यांनी विजय संपादित केला त्याचबरोबर भाजपाचे रोहित राजेंद्र नागटिळे हेही निवडून आले प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या चुलती माजी नगरसेविका मंगलाताई नाईक निंबाळकर या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या मात्र या ठिकाणी भाजपाचे किरण राऊत हे फक्त दोन मतांनी निवडून आले या ठिकाणी शिवसेनेचे दीपक कुंभार यांचा धक्कादायक पराभव झाला, प्रभाग क्रमांक सात मध्ये माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी भाजपाचे गटनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव करीत मलठण मध्ये भाजपाचा गड आला परंतु सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली, या ठिकाणी भाजपाच्या स्वातीताई राजेंद्र भोसले यांनी विजयी संपादित केला यामुळे मलठण मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

    प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वात तरुण उमेदवार यांनी माजी नगरसेविका सुवर्णाताई खानविलकर यांचा पराभव केला तसेच या ठिकाणी नवखे उमेदवार विशाल तेली यांनी माजी नगरसेवक फिरोज आतार यांचा धक्कादायक पराभव करीत या ठिकाणी एक शिवसेना अनेक भाजपा असा दोन उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष पंकज पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी पराभव केला तसेच कविताताई मदने यांनी रजिया मेटकरी यांचा पराभव केला या मध्ये शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला.

    प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी नगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांचे पुतणे अमित शेठ भोईटे यांनी गणेश शिरतोडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला तसेच कुमारी श्वेता किशोर ताराळकर यांनी भाजपाचे युवा नेते बबलू शेठ मोमीन यांच्या मातोश्रींचा पराभव करीत इतिहास घडविला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांचा संदीप चोरमले यांनी मोठ्या फरकाने पराभव करीत इतिहास रचला, याच ठिकाणी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या स्नुषा प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले उर्फ दीदी यांनी प्रियांका युवराज निकम यांचा धक्कादायक असा पराभव केला आहे.

    प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करीत या ठिकाणी इतिहासात नोंद होईल असा पराभव करून विकास काकडे सर व स्मिता संगम शहा यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण निवडून आणीत भाजपाला दे धक्का दिला. प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके यांचा राहुल भैया निंबाळकर यांनी धक्कादायक पराभव करीत इतिहास रचला त्याचबरोबर दुसऱ्या उमेदवार रूपालीताई अमोल सस्ते यांनी तसेच मोहिनी मंगेश हेंद्रे यांनी भाजपाचे कमळ फुलवीत राजे गटाच्या बालेकिल्ल्यात श्रीमंतांना मोठी चपराक देत विजय संपादित करून राजे गटाला मोठा धक्का दिला आहे.

    फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अपक्षांचा अन् राष्ट्रीय काँग्रेस चा कुठेही प्रभाव पडला नाही त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये फक्त दोन मतांनी निवडून येत किरण राऊत यांनी दीपक कुंभार यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पंकज पवार यांनी अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी धक्कादायक पराभव केला.

No comments