Breaking News

फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांना कॅंडल मार्चने श्रद्धांजली

Candle march pays tribute to Dr. Sampada Munde in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ नोव्हेंबर - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील पीडिता महिला डॉक्टर यांना येथील गजानन चौकात आज फलटण तालुक्यातील नागरीकांच्या वतीने कॅंडल मार्च काढत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.राष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी या मार्चचे संयोजन ने केले.

    यावेळी आमदार सचिन पाटील, जयकुमार शिंदे, सचिन सूर्यवंशी बेडके, महेंद्र सूर्यवंशी बेडके, अमोल सस्ते, विराज खराडे, सुधीर अहिवळे, नंदकुमार मोरे,सचिन काकडे, सनी काकडे, बापूराव शिंदे, महादेव गायकवाड, विजय शिंदे, प्रतिभाताई शिंदे,माऊली सावंत, अमोल रासकर ,मंगेश आवळे, विक्रम शितोळे,गिरीश बनकर युवराज शिंदे, राहूल निंबाळकर, जॉनी इंगवले,रेश्मा कामरान पठाण,रानी भोसले,विजय जाधव,यास्मीन बागवान यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

    ऐन दिवाळीत झालेल्या पीडिता आत्महत्या प्रकरणाने सातारा,बीड जिल्हयासह संपूर्ण राज्याच्या विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.एका हुशार, धाडशी आणि उमदया डॉक्टर युवतीवर आत्महत्या करण्याची वेळ आली.ही घटना फलटणच्या इतिहासात काळिमा फासणारी आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यांचा हा दुर्दैवी मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.या डॉक्टर युवतीला उपस्थित फलटणकरांनी जड अंतःकरणाने श्रध्दांजली वाहिली.

    पोलिस स्टेशन व प्रशासकीय आधिकारी यांच्या भूमिका संशयास्पद आहेत, प्रशाशन पूर्ण महायुती सरकारच्या दबावाखाली आहे, घरगडी असल्या सारखी वर्तणूक आहे, पीडितेच्या मृत्यू पूर्वी तीन महिन्यातील कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावं, त्याच प्रमाणे बदने यांचे कॉल तपासून सत्यता तपासून पहावी असे मत फलटण तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी -बेडके यांनी व्यक्त केले.

    पीडित डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी योग्य तो तपास होऊन लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास व्हावा तपासात राजकीय हस्तक्षेप नको असे मत युवराज शिंदे यांनी व्यक्त केले.

    छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर व अपराजित योद्धा छत्रपती शंभूराजे यांचे आजोळ, ज्या विघातक घटनेने कलंकित होत आहे, ते सर्व सामान्य फलटणकर म्हणून माझ्या मनाला विच्छिन्न करणारे आहे असे मत
गिरीश बनकर यांनी व्यक्त केले.

No comments