तिरकवाडी रस्ता मुरुमीकरण प्रकरणात दावा दाखल करणार - श्रीमती लंगडे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ नोव्हेंबर - तिरकवाडी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीने ग्राम समृद्ध योजनेतून 2008 साली गावातील मुख्य रस्ते मुरुमीकरण व खडीकरण करण्यात आले आहे, सदर कामाचे बिल रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद न करता, सर्व रस्त्याची रक्कम खर्ची टाकल्या प्रकरणी कलम 80 नुसार सिविल कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना श्रीमती चंद्रभागा किसन लंगडे ज्येष्ठ नागरिक यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती चंद्रभागा लंगडे यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती यांना वेळोवेळी ती रेकॉर्डिंग गावातील रस्ते 26 आली यशवंत ग्राम समृद्ध योजनेतून केली असून रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरण करण्यात आले आहे यासाठी जवळजवळ 15 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे सदर खर्च सदर रस्त्याची नोंद न करताच केली आहे याबाबत त्यांनी वेळोवेळी निवेदन आत्मदहनाचा इशाराही दिला आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त पुढे कारवाई करू असे पत्र त्यांना दिलेले आहेत याबाबत त्यांना मोठा मानसिक त्रास झाला असून त्यांचे सध्या वय झाले असून त्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सध्या हे काम करणे मुश्किल झाले असल्याने शेवटी त्यांनी वैतागून जिल्हाधिकारी यांना कलम 80 नुसार दावा दाखल करण्याची नोटीस दिली आहे हा दावा जिल्हाधिकारी याच्या बरोबर संबंधित उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी फलटण पंचायत समिती, सरपंच व ग्रामसेवक तिरकवाडी यांच्यावर दावा दाखल होणार आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदनात त्यांनी 60 दिवसाची मुदत दिलीआहे तरी याबाबत ठोस कारवाई न झाल्यास म्हणजे रस्त्याची तिरकवाडी ग्रामपंचायत दप्तरी नोंद न झाल्यास वा संबंधित अधिकाऱ्यावर रस्ता चोरी झाल्याचा गुन्हा दाखल न केल्यास सिविल कोर्टात दावल दावा दाखल करण्याची सांगितले आहे.

No comments