अनुष्का अभिजीत कोठारी हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ नोव्हेंबर २०२५ - श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसईची खेळाडू अनुष्का अभिजीत कोठारी हिने सांगली येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटामध्ये सुवर्णपदक पटकावले.असून तिची 18 ते 20 नोव्हेंबर रोजी बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरिय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशाबद्दल अनुष्काचे सर्व स्तरातील अभिनंदन होत आहे.
अनुष्का कोठारीला शिहान संतोष मोहिते (संस्थापक / अध्यक्ष चॅम्पियन्स कराटे क्लब, महाराष्ट्र), सेन्सेई सुरज ढेंबरे सर, सेन्सेई प्रिया शेडगे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अनुष्काच्या या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री.शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, प्राचार्या दीक्षित मॅडम यांनी अभिनंदन केले.

No comments