Breaking News

फलटण मध्ये घरफोडी ; २४ तोळे सोन्याचे दागिने लंपास

Burglary in Phaltan; 24 tolas of gold ornaments looted

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - : येथील शिवशक्ती चौक, रविवार पेठेतील बंद राहते घर व दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १४ लाख २७ हजार ७ रुपये किंमतीचे सुमारे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. अक्षय जितेंद्र दोशी यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    याबाबत शहर पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री १ ते सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान फिर्यादी रहात असलेल्या शिवशक्ती चौक, रविवार पेठ, फलटण येथील २ मजली बिल्डींगचे मुख्य दरवाजाचे सेफ्टी डोअरचा कडी - कोयंडा कोणीतरी अज्ञात इसमाने तोडुन घरात प्रवेश करुन पहील्या माळ्यावरील बंद बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडुन एकुण १४ लाख २७ हजार ७ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले आहेत.
    चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ६३ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसुत्र, ६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ४ चोकोर, ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ कंगण, ६५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ बांगड्या, ०.२१ मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे स्क्रु, ०.४५ मिली ग्रॅम वजनाची सोन्याची एक  नथ अशा वर्णनाचे १४ लाख २७ हजार ७ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले आहेत.
    शहर पोलिस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक काळे यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम अधिक तपास करीत आहेत.

No comments