सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.16: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार असून पिडीत कुटुंबला सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सासपडे येथे जावून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नितीन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल उपस्थित होते.
कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणाची केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. पोलीस विभागाने सखोल तपास केला असून आरोपी कुठल्यही परिस्थितीत सुटणार नाही. केस फास्ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी नामांकित वकील देण्यात येईल. सासपडे येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्यावतीने पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येकी 5 लक्ष रुपयाची मदत दोन पिडीत कुटुंबांना दिली आहे.
No comments