भाडेवाढ प्रश्न पणनकडे प्रलंबित असतानाही राजकीय हेतूने आंदोलन - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ ऑक्टोबर २०२५ - फलटण तहसील कार्यालयाबाहेर काही मार्केट कमिटीचे गाळेधारक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत असून, वास्तविक गाळे भाडेवाढीचा प्रश्न हा पणन संचालनालय, पुणे येथे प्रलंबित आहे. येत्या २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पणन संचालनालयाने मार्केट कमिटी व गाळेधारकांना बैठकीसाठी बोलावले असून, बैठकीतील निर्णय समितीला मान्य असेल, असे स्पष्ट करूनही विरोधकांनी राजकीय हेतूने आंदोलन सुरू केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की,कृषी उत्पन्न बाजार समितीला इतर कोणतेही आर्थिक उत्पन्न नाही, त्यामुळे या गाळ्यातून येणारे भाडे हेच खरे उत्पन्न असल्याने, त्याच बरोबर दर दहा वर्षानंतर दुप्पट भाडेवाढ झाल्याने सन 2023 रोजी ही भाडे वाढ 600 वरून 1250 करण्यात आले, त्यामध्ये कोणताही अन्याय केला नसल्याचे तसेच पणन संचालकांकडून भाडेवाढ बाबत बैठक बोलावली असतानाही, उपोषणाला बसून संस्थेचे नुकसान करण्याचा उद्देश, गाळाधारक व विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
ही भाडेवाढ अगदी अल्प असून संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड नरसिंह निकम यांचे सुद्धा मलठण मध्ये स्वतःचे गाळे आहेत, त्यामध्ये महसूल विभागाची कार्यालय असून त्यांना किती भाडे मिळते, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे ही भाडेवाढ अजिबात अन्यायकारक नसून, केवळ भाडेकरूंना हाताशी धरून, विरोधक राजकारण करीत आहेत, तुम्ही राजकारण जरूर करा मात्र ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीला गेली तीन वर्ष लागोपाठ प्रथम क्रमांकाने राज्य सरकारने सन्मानित करण्यात आले, त्या अतिशय चांगल्या चाललेल्या संस्थेमध्ये राजकारण करून, तुम्ही केवळ गाळेधारकांची दिशाभूल करीत आहात असा टोला ऍड नरसिंह निकाम यांना लागावीत, प्रत्येक संस्थेमध्ये तुम्ही राजकारण करून, संस्था आर्थिक तोट्यामध्ये कशी जाईल याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहात, मात्र आमच्या आजोबांनी दिलेले संस्कार यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी चालवीत असलेल्या संस्थेमध्ये कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, आणि कोणाला करूही देणार नाही. ही बाजार समिती विविध शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत असताना केवळ आणि केवळ आणि दिवाळीच्या तोंडावर उपोषणाला बसून, संस्थेचे नाव खराब करण्यामध्ये यांना रस असल्याची टीका श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेला सचिव शंकरराव सोनवलकर, व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर तसेच इतर संचालक उपस्थित होते.
No comments