सुरेश शिंदे यांच्या सत्याचा आसूड ला नारायण सुर्वे 'साहित्य पुरस्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ - ग्रामीण वास्तववादी साहित्यिक 'सर्ज्या'कार श्री. सुरेश शिंदे यांच्या 'सत्याचा आसूड' या कादंबरीला कवी नारायण सुर्वे 'साहित्य पुरस्कार' जाहीर झाला असून नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संम्मेलनात या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक
मा. उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या साहित्य संम्मेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे करणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप १०,००० रोख, स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. सत्याचा आसूड या कादंबरीला ज्येष्ठ समिक्षक प्रा. रणधीर शिंदे यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे.
No comments