फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी दि.८ रोजी ११ वाजता आरक्षण सोडत ; हरकती दि.९ ते १४ ऑक्टोबर पर्यंत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑक्टोबर - फलटण नगरपरिषदेच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीकरिता अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आरक्षण सोडत दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन मागील नवीन इमारत (दूरध्वनी केंद्राजवळील), तळमजला, फलटण येथे पार पडणार आहे.
सोडतीनंतर आरक्षणाचा तपशील गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या संदर्भात हरकती व सूचना ०९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येतील.
हरकती व सूचना मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद कार्यालय, फलटण (जि. सातारा) येथे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
No comments