Breaking News

फलटण येथे तालुकास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा संपन्न ; खेळामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ - समशेरसिंह नाईक निंबाळकर

Taluka level Kabaddi competition concluded in Phaltan; Sports improve children's physical and mental health - Shamsher Singh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ ऑक्टोबर २०२५ - खेळामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनते व मुलांमध्ये जय - पराजय पचवायची ताकद निर्माण होते, त्यामुळे अशा स्पर्धा सर्व स्तरावर आवश्यक असल्याचे नगरपरिषदेचे माजी विरोधी नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण येथे तालुकास्तरीय  विद्यार्थ्यांच्या कबड्डीच्या स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी समशेर सिंह निंबाळकर बोलत होते. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव नामदेव तथा बाळासाहेब भोसले, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, फलटण तालुका क्रीडा अधिकारी सौ. सुप्रिया गाढवे, माजी नगरसेवक व संस्थेचे संचालक अशोकराव जाधव, संचालक अजित गायकवाड, बाळासाहेब घनवट, प्राचार्य रणदेव खराडे, मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी, मुख्याध्यापक शिवाजी पवार, मुख्याध्यापक संजय शिंदे व फलटण तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून काशिनाथ सोनवलकर, प्रा. घोरपडे, हिंदुराव लोखंडे, श्री भोसले, पंकज पवार, श्री दडस यांनी कामकाज पाहिले.स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांच्या कबड्डी संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

No comments