प्लास्टिक बरणीत मान अडकलेल्या कुत्र्याची केली सुटका
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑक्टोबर २०२५ - फलटण तालुक्यातील जाधववाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एका मोकाट कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिकची बरणी अडकून तो अत्यंत त्रस्त अवस्थेत फिरताना दिसत होता. स्थानिकांनी ही बाब नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांना कळवली.
माहिती मिळताच संस्थेचे सदस्य रवींद्र लिपारे, सुजल लिपारे, जयेश शेट्ये आणि बोधीसागर निकाळजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव साहित्याचा वापर करून कुत्र्याच्या तोंडात अडकलेली बरणी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षितपणे काढली.
या यशस्वी बचावामुळे कुत्र्याची यातना संपली. स्थानिक नागरिकांनी या प्रयत्नाचे मनःपूर्वक कौतुक केले व संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
No comments