सखोल चौकशी करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑक्टोबर २०२५ - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिसांच्या त्रासापायी केलेली आत्महत्या दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या महिला डॉक्टरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधम आरोपींना अतिशय कडक शासन करण्याची आणि मोबाईलचा सीडीआर तपासण्याची मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने केलेली आत्महत्या अतिशय दुर्दैव घटना आहे, या महिला भगिनीने का आत्महत्या केली, याचा सखोल तपास होण्यासाठी त्या महिला भगिनीचा तसेच दोन्ही पोलिसांचा मोबाईल चॅटिंग आणि सीडीआर रिपोर्ट तपासला तर अधिक सत्य बाहेर येईल. फलटणमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. फलटणकारांना या घटनेने धक्का बसला असून ज्यांच्या पायी आत्महत्या केली, त्या नराधमांना कठोर शासन होणे गरजेचे आहे.सदर महिलेचा खटला विशेष चौकशी पथक नेमून फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची गरज आहे. जेणेकरून या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

No comments