महिला डॉक्टर केसमधील आरोपी प्रशांत बनकरला अटक ; चार दिवसांची पोलीस कोठडी ; पीएसआय गोपाळ बदने फरार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑक्टोबर २०२५ - उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवातीने आत्महत्या केल्याने, संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला फलटण येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, यातील दुसरा संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने मात्र अद्याप फरार आहे.
दरम्यान त्या दुर्दैवी डॉक्टर युवतीवर मोठ्या शोकाकुल वातावरणात तिच्या गावी बीड मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले असून, हे प्रकरण आता चांगलेच गाजले आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट नावे घेत मोठा खुलासा केला आहे, तर माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी म्हणून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले तर मराठवाड्याचे डॅशिंग आमदार सुरेश धस व आमदार प्रकाश सोळंखी यांनी त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात दुर्दैवी मुलीचा हाकनाक बळी गेल्याचे विरोधी पक्षातील लोकांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांवर मोठे आरोप केले असून, जोपर्यंत गोपाळ बदने सापडत नाही तोपर्यंत पोलिसांवर स्थानिक लोकांनी व राजकीय मंडळींचे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर येत असून, त्या संशयित पोलीस अधिकाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची मात्र दमछाक झाल्याचे चित्र फलटण मध्ये पहायला मिळत आहे.तसेच बदने याचे शेवटचे लोकेशन हे पंढरपूर शहराजवळ आढळून आले आहे.

No comments