Breaking News

शरयू ॲग्रोचे संचालक अविनाश भापकर यांच्या मातोश्री कांताबाई भापकर यांचे निधन

Avinash Bhapkar's mother Kantabai Bhapkar passes away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्याचे संचालक अविनाश भापकर यांच्या मातोश्री कांताबाई शिवाजी भापकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आसू गावात शोककळा पसरली आहे.

    कांताबाई भापकर या शांत, मनमिळाऊ आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी सामाजिक व सांप्रदायिक ऐक्य जपण्याचे काम आपल्या आयुष्यभर केले. विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांत त्यांचा नेहमी सहभाग असे.

    त्यांनी अत्यंत परिश्रमातून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित बनवले. डॉ. महेश भापकर, रवींद्र भापकर आणि अविनाश भापकर हे तिघेही आज आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.

    कांताबाई यांच्या निधनाने भापकर कुटुंबासह आसू परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments