चालक वाहक दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षा चालकांचा सत्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ सप्टेंबर २०२५ - चालक वाहक दिना निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण यांच्या कडून फलटण शहरातील रिक्षा चालक मालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोटर वाहन निरीक्षक मारुती चौगुले, मोटर वाहन निरीक्षक समीर वाघ,सागर लाळगे, करणसिंह लेंभे, उमाकांत दीक्षित उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेमार्फत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मोटर वाहन निरीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम, माजी अध्यक्ष महेंद्र काकडे, सचिव उदय काकडे,ओंकार ड्रायव्हिंगचे संचालक आप्पा, उमेश अहिवळे, राजेंद्र काकडे, निलेश रिटे, योगेश पोरे, गणेश काकडे, राजेंद्र देशमुख, राहुल पवार, संजय मोरे, आनंद जगताप, पपु भोसले,जाकीर कोतवाल, रमेश मोहोळकर, प्रसाद बर्वे, सुरज पवार, नौशाद शेख, रमेश भोसले, अशोक जाधव, बाळासाहेब कांबळे, राजु माने, भानदास टाळकुटे,बिलाल शेख हे सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments