घरातील महिला सशक्त असेल तर कुटुंब सशक्त होईल - आ.सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ सप्टेंबर २०२५ - प्रत्येक महिलेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना व उपक्रम राबवत असते. आज स्वस्थ नारी - सशक्त परिवार या उपक्रमाचा शुभारंभ होत असून, पंचक्रोशीतील सर्व महिला ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, येथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेणारी आमची आई व बहीण यांचे आरोग्य चांगले असले पाहिजे, घरातील महिला सशक्त असेल तर कुटुंब सशक्त होईल या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.
राजाळे ता.फलटण येथील पीएससी सेंटर मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सचिन पाटील बोलत होते.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रमास प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजीत जाधव, पंचायतराज अभियानाचे संपर्क सचिव तथा जिल्हा परिषद मुख्य लेखा-वित्त अधिकारी राहुल कदम, लेखा अधिकारी समाधान चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार सौ देवकाते मॅडम, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, मंडळ कृषी अधिकारी बरड स्वप्निल बनकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, रयुवा नेते संदीप चोरमले, सरपंच सौ कविता महिपाल, माजी सरपंच सौ. सविता शेडगे, सौ स्वाती दोंदे, सौ. पद्मावती शेडगे, माजी सरपंच मोहनराव सुतार, उपसरपंच प्रेमचंद भोईटे, सोसायटी चेअरमन श्री नीलकंठ धुमाळ, माजी चेअरमन मारुती जाधव, संपतराव जाधव, गणपतराव लक्ष्मण निंबाळकर, व्हा.चेअरमन बापुराव देशमुख, सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील महेश शेडगे, उमेद सीआरपी सौ अश्विनी शेडगे, बचत गटाच्या महिला पदाधिकारी, केंद्र शाळा प्रमुख सौ छाया भोसले, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी कैलास जाधव, डॉ.पारवे पाटील, आशा/अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी श्री आनंदराव गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
No comments