देशातील प्रमुख ब्रँड असणारे 'गोविंद' लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
![]() |
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर |
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या यशामध्ये संचालक - अधिकारी - कर्मचारी - दूध उत्पादक ते शेवटच्या घटकापर्यंत सर्वांचेच मोठं श्रेय - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ सप्टेंबर २०२५ - महाराष्ट्रातील व देशातील प्रमुख ब्रँड असणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या यशा पाठीमागे श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत शिवांजलीराजे, सत्यजितराजे यांचे अथक परिश्रम असून, तीस वर्षांपूर्वी लावलेल्या गोविंदच्या छोट्या रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात झाले आहे आणि लवकरच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
![]() |
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचा वर्धापन दिन केक कापून साजरा करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मिथालीराजे सत्यजितराजे नाईक निंबाळकर |
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त 'उत्सव ३० वर्षांचा' हा कार्यक्रम आनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे उत्पन्न झाला, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी अभिनेते समीर चौघुले, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्यातील मान्यवर व गोविंद मिल्कचे सीईओ धर्मेंद्र भल्ला व त्यांचे सर्व सहकारी आणि दूध उत्पादक शेतकरीउपस्थित होते.
संजीवराजे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू करून, तो स्पर्धात्मक युगात मोठा केला, त्याच वेळी दूध उत्पादकाला देखील न्याय देण्याचे काम गोविंदच्या माध्यमातून त्यांनी केले, आज गोविंद ब्रँड हा महाराष्ट्रासह देशात आघाडीवर आहे, गायींची नवीन ब्रीड देखील गोविंदने तयार केली आहे, दूध उत्पादकांना योग्य दर देण्याचा बॅलन्स देखील गोविंदने साधला असल्याचे सांगतानाच गोविंदचा आज तिसावा वर्धापन दिन आहे, थोड्या दिवसात गोविंदचे चेअरमन संजीवराजे यांचा ६० वा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा असल्याचे जाहीर केले व गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, गोविंद कुटुंबासह दूध उत्पादकांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
गोविंदची सुरुवात ही 200 ते 250 लिटरने झाली होती, त्यानंतर शेती शाळेच्या आवारामध्ये छोटा प्लांट तयार केला, तेथे दूध थंड करून ते कॅडबरीला द्यायचे, अशी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट ची सुरुवात झाली आणि तेथून प्रवास सुरू होत गोविंदने आजचे स्थान मिळवले असल्याचे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
दूध व्यवसायात अनेकजण उतरले असताना, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टने दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर द्यायचा व त्यांच्याकडून चांगल्या प्रतीचेच दूध घ्यायचे आणि ग्राहकांपर्यंत अत्यंत उत्तम असे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ पोहोचवायचे, हे तत्व नेहमीच पाळले आहे. आणि त्यामुळेच आज गोविंदच्या सर्व उत्पादनाला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोविंद फक्त व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी कंपनी नव्हे तर ग्राहकापर्यंत पोहोचून ग्राहकांना उत्तम क्वालिटीचे दुग्धजन्य पदार्थ देणारी कंपनी असल्याचेही श्रीमंत संजीवराजे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून अवॉर्ड्स कंपनीला आपण दुधाची भुकटी देतो, बालकांसाठी व वयोवृद्धांना लागणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये ती भुकटी वापरली जाते, म्हणजे एवढ्या उच्च प्रतीची भुकटी उत्पादित करण्यात आपणा सर्वांना यश मिळाले आहे आणि यामध्ये आपल्या सर्वांचेच म्हणजे गोविंदच्या संचालक मंडळापासून ते अधिकारी - कर्मचारी वर्ग आणि दूध उत्पादक ते शेवटच्या घटकापर्यंत सर्वांचे यामध्ये श्रेय आहे. तसेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून अनेक दुग्धजन्य पदार्थ तयार होतात ते सर्व प्रॉडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सेल्स टीमचेही यामध्ये श्रेय आहे. चांगले दूध निर्माण करण्यासाठी चांगले खाद्यही द्यावे लागते, आणि ते पुरवण्यासाठी देखील गोविंदच्या माध्यमातून सहकार्य केले जाते त्यांचेही यामध्ये मोठं योगदान असल्याचे सांगत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या सर्वांचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या 'उत्सव 30 वर्षांचा' कार्यक्रमात गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सीईओ धर्मेंद्र भल्ला साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनतर डॉ.गणेश सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दूध उत्पादक, दूध व्यवसायिक व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
No comments