Breaking News

गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करण्यासाठी रयत क्रांतीचा धडक मोर्चा; रयत क्रांती संघटनेच्या मंगळवारी फलटण येथे धडक मोर्चा

Rayat Kranti's Dhadak Morcha to change the cow slaughter ban law; Rayat Kranti's Dhadak Morcha in Phaltan on Tuesday

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० सप्टेंबर २०२५  - रयत क्रांती संघटनेच्यावतीने गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करण्यासाठी तसेच दूध व ऊस दरवाढ यासह शेतकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फलटण येथील तहासिल कार्यालयावर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अमोल खराडे यांनी दिली.

    या बाबतचे निवेदन फलटण तहसील कार्यालयात दिले, या धडक मोर्चा मधील प्रमुख मागण्या दूध उत्पादक शेतकयांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोटे वाचवायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे, या कायद्याच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकयांच्या गोठ्यामधील भाकड गाई, म्हैशी, वयस्कर गाई विविध कारण मुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत, अशा खोडांचा गंभीर प्रश्न दूध धंद्यातील दराच्या चढ-उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे, यामुळे जर्सी गाईंच्या गोठ्यांचे मालक दूध व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक संकटात सापडले आहेत.

    त्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांनी अतिशय प्रखर भूमिका घेतली असून या भूमिकेचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. ज्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये अशा दूध न देणाऱ्या तीन चार गाई आहेत तो शेतकरी पूर्णतः उध्वस्त होण्याच्य मार्गावर आहे, त्याच्या या गाई तात्काळ जर विकल्या गेल्या नाहीत, तर तो शेतकरी या गाईंच्या चारा पशुखाद्य यामुळे तोट्यात जाणार आहे. तसेच त्याचा गोठा संपणार आहे, तो या व्यवसायातून बाजूला होणार असून, त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. त्यामुळे अशा गोवंश हत्याबंदी सारख्या शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये सुधारणा करणे काळाची गरज आहे, तसेच या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे त्रस्त झालेला महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आमदार सदाभाऊ खोत यांनी, या कायद्याच्या विरोधामध्ये घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे कधी नव्हे तो एकवटल्याच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे.

    दूध उत्पादक शेतकऱ्याच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने, त्यामध्ये प्रामुख्याने दूध दराचा प्रश्न हा प्रति लिटर गायीच्या दुधाला चाळीस रुपये असावा ही मागणी जोर धरू लागली आहे, या सर्व मागण्या व दूध उत्पादकाचा आवाज सरकार दरबारी जाण्यासाठी ग्रामीण भागातील दूध उत्पादक एकवटले आहेत.   रयत क्रांती संघटनेच्या झेंड्याखाली होत असलेल्या शेतक‌ऱ्याच्या विविध मागण्यांसाठीच्या मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकरी मोठ्या उत्साहाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

    त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या ऊसाला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळण्यासाठी साखरेचे आधारभूत किंमत प्रति किलो चाळीस रुपये करण्यात यावी. नैसर्गिक संकटामुळे त्याचबरोबर विविध पिकांना नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कर्जाच्या ओझाखाली सापडला आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथून तहसील  कार्यालय फलटण येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत कांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाचे आयोजक सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारांमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील मुळीक तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते खंडू करचे, तालुकाध्यक्ष अभिमन्यू ढोपरे, खंडेराव सरक, शेखर खरात, हेमंत सुतार, प्रसाद अनपट, सुधीर शिरसागर, दादा गोफणे, चेतन चव्हाण, संतोष जावळकर, राजेश खराडे, निलेश सोनवलकर, दीपक सस्ते, संतोष शेडगे, सागर डोईफोडे, साई शिदे, पांडुरंग गायकवाड, योगेश संकपाळ, विशाल संकपाळ, तुकाराम गावडे, अमर गावडे, सागर सोनवलकर, अलंकार भोईटे, भरत नांगरे, प्रवीण कदम, बाळू शिंदे, रामदास सोनवलकर, नवनाथ कुंडलकर, त्रिंबकराव डोंबाळे, दीपक डोंबाळे, अक्षय झणझणे आदी दूध उत्पादक शेतकरी संपूर्ण तालुक्यामध्ये वाडी वस्तीवर फिरून दूध उत्पादकांमध्ये जनजागृती करून सरकार दरबारी दूध व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचे काम करत आहेत.

No comments