माजी नगरसेवक हरिष काकडे (नाना) यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ सप्टेंबर २०२५ - फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीमत्त्व हरिष चंदरराव काकडे तथा नाना यांचे आज रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता फलटण येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
2001 ते 2006 या कालावधीत हरिष काकडे (नाना) यांनी फलटण नगर परिषदेत नगरसेवक म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी महात्मा फुले कामगार वसाहतीत 2 समाज मंदिरे उभारली. सांडपाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली. आज कामगार वसाहतीत असणारे बुध्द विहार त्यांच्याच प्रेरणे उभे राहिले.
नानांनी विविध पदावर काम केले म्युनिसिपल कामगारांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न केले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यानंतर सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवरही त्यांनी प्रभावी काम केले आहे.
सातारा जिल्हा खरेदी विक्री संघात अनेक वर्षे संचालक, उपाध्यक्ष म्हणून दैदिप्यमानकार्य नानांनी केले. यामध्ये किसनवीर, माजी आमदार लालसिंग शिंदे, माजी आमदार बाबुराव घोरपडे, केशवराव पाटील, लक्ष्मण पाटील हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा खरेदी विक्री संघावर होते.
No comments