भारतील सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून युवकाची लाखोंची फसवणूक
सातारा दि.२०(प्रतिनिधी) - भारतीय सैन्यदलात नोकरीला लावतो अस सांगत एका युवकाला लाखों रुपयाला गंडा घातला आहे.याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रदीप विठ्ठल कोळे (रा. कोळे ता. कराड) असं संशयित आरोपीचं नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार रितेश नितीन जाधव वय २१ (रा.नेले.पो.किडगाव.ता.सातारा) यांनी दिली आहे.रितेश जाधव यांचा भाऊ आयुष जाधव याला भारतील सैन्य दलामध्ये ए एम सी युनिटचे क्लार्क पदावर जॉबला लावतो असं सांगून एक वर्षापूर्वी प्रदीप कोळे याने ३ लाख ७० हजार रुपये घेतले होते.मात्र एक वर्ष होऊन गेलं तरी नोकरीला न लावता प्रदीपने उडवाउडीची उत्तर द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयुष जाधव याच्या भावाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार करत आहेत.
No comments