ग्रामपंचायत महासंघाचे साताऱ्यात बेमुदत धरणे आंदोलन
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.9 सप्टेंबर - ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने साताऱ्यात त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले .कर्मचाऱ्यांना निर्वाह भत्ता शासकीय तिजोरीतून मिळावा, तसेच महासंघाच्या मागण्यांच्या प्रोसिडिंग ग्रामविकास विभागाने तात्काळ मंजूर करावे याबाबत ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीत या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्याचे अंमलबजावणी होत नाही या निषेधार्थ महासंघाने साताऱ्यात धरणे आंदोलन केले.
महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ठोंबरे,कॉम्रेड मिलिंद गणवीर, सरचिटणीस चव्हाण, संघटक सचिव सखाराम दुर्गडे,एबी कुलकर्णी, मंगेश म्हात्रे , बबन पाटील, सुधीर टोकेकर,उज्वल गांगुर्डे, वसंतराव वाघ, हरिश्चंद्र सोनवणे, अमृत महाजन, शाम चिंचणे , निळकंठ ठोके व राहुल जाधव यांच्यासह महासंघाचे 100 आंदोलक यानिषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत महासंघासाठी अभय यावलकर समितीच्या शिफारशी स्वीकारणे, किमान वेतनातील देय वाढीव फरक देणे,किमान वेतनासाठी कमिटीद्वारे नवीन दर लागू करणे, उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करणे, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे भरती करणे, भरती प्रक्रियेत गट ड चा समावेश करणे, जाचक आकृतीबंधाप्रमाणे सुधारणा करणे, उत्पादन निकष बदलणे, 100% राहणीमान भत्ता शासनाच्या तिजोरीतून मिळणे, कर्मचाऱ्यांचे मासिक नियमित वेतन थेट खात्यातून मिळणे इत्यादी मागण्या वारंवार करण्यात आल्या आहेत .विशेष म्हणजे यातील बहुतांश मागण्या शासनमान्य आहेत तरीदेखील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .
    या संदर्भात 14 मे 19 मे या तारखांना महासंघाची शासनाबरोबर दोन वेळा बैठक झाली मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही म्हणून राज्यव्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते . त्यानुसार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत आहोत ग्रामविकास विभागाने याबाबत तत्काळ भूमिका घ्यावी अशी सर्व आंदोलकांनी मागणी केली आहे.
 
 

 
 
.jpg) 
 
.jpg) 
 
 
 
No comments