नीरा उजवा कॅनॉलमध्ये विसर्जित गणेशमूर्ती उघड्यावर ; भक्तांमध्ये नाराजी
फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि.१७ सप्टेंबर २०२५ - नीरा उजवा कॅनॉलचे पाणी कमी झाल्यामुळे फलटण शहरातील पंढरपूर पूल परिसरात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती आता उघड्यावर पडलेल्या दिसत आहेत. यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धेने विसर्जित केलेल्या बाप्पांच्या मूर्तींची अशा प्रकारे विटंबना होत असल्याची भावना व्यक्त होत असून, या मूर्तींची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी गणेशभक्तांकडून होत आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून, पुढील वर्षांपासून अशी परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी मागणीही केली आहे.
गणेशोत्सवानंतर मोठ्या भक्तिभावाने मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र आता उघड्यावर पडलेल्या मूर्तींमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. “प्रशासनाकडे जर योग्य नियोजन असते तर अशी वेळ आली नसती”, असे स्थानिक नागरिकाने सांगितले.


No comments