Breaking News

भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर व पोकलेन तामिळनाडूत विकला ; २ जणांना अटक - ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; फलटण पोलिसांची कामगिरी

65 lakh worth of valuables seized; Performance of Phaltan police

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ सप्टेंबर २०२५ - फलटण शहरातील शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुकद्वारे ट्रॅक्टर भाडयाने दिले जातील या बाबतची जाहिरात दिल्याने, कर्नाटकातील इसम नामे मुस्ताक मोहम्मद हुसेन याने विनय संपत माने यांस आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून, त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन भाडयाने करार करून, कर्नाटक येथे घेऊन गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी ठरल्याप्रमाणे भाडे घेण्यासाठी संपर्क साधला असता, आरोपी याने मोबाईल फोन बंद केला व त्याने दिलेला पत्ता व सरकारी कामाची वर्क ऑर्डर खोटी असल्याचे लक्षात आले यावरून फलटण शहर पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

    दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशाने फलटण शहर पोलीस ठाणेकडील तपास पथक यांनी आरोपीचा कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी शोध घेतला असता, बातमी दारामार्फत आरोपी मुस्ताक मोहम्मद हुसेन यांस नायगांव मुंबई येथून ताब्यात घेऊन, त्याच्याकडे तपास केला असता, सदर आरोपी व त्याचा साथीदार इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी, राहणार कनार्टक यांनी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर व पोकलॅन घेऊन खोटया कागदपत्राच्या आधारे दुसऱ्या राज्यात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरून आरोपी नामे इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी यांस कनार्टक राज्यातून ताब्यात घेऊन गुन्हयातील फसवणूक करून नेलेले ट्रॅक्टर व पोकलेन तामीळनाडू राज्यातून हस्तगत करणेत आले आहेत. नमूद आरोपी हे शेतकऱ्यांना सरकारी कामाच्या खोटया वर्क ऑर्डर दाखवून शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर, पोकलेन इत्यादि वस्तु घेऊन दुसऱ्या राज्यात विकणारी आंतरराष्ट्रीय टोळी आहे.

    अशा प्रकारे फलटण शहर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने आरोपी नामे (१) मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन वय ३८ वर्षे रा. वासावी स्कुलच्या मागे काझी मोहल्ला, वी.टि.सी चित्रदुर्ग, जिल्हा चित्रदुर्ग राज्य कर्नाटक (२) इदमा हबिब रेहमान कुंजी बिहारी वय ६४ वर्षे रा- १-८५, अहुर, ठाणा- मुडबिंद्री, ता मॅन्गलौर जि दक्षिण कन्नडा राज्य कर्नाटक यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन जॉईंडिअर कंपनीचे ट्रॅक्टर, एक लुगॉन कंपनीचे पोकलेनअसा एकुण ६५,००,०००/- रुपये (पासष्ट लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल कनार्टक, तामीळनाडु व महाराष्ट्र राज्यांमध्ये तपास करुन जप्त करण्यात आला आहे.  गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे या करीत आहेत.

    सदरची कामगिरी मा. श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर, अपर अधीक्षक सातारा, मा. श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे श्री हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, विजयमाला गाजरे, पोलीस उपनिरीक्षक, संतोष कदम सहा. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी केली आहे.

No comments