Breaking News

फलटण नगरपालिकेत निखिल मोरे यांचा शेवटचा दिवस संस्मरणीय

Nikhil More's last day in Phaltan Municipality was memorable.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ सप्टेंबर २०२५ - फलटण नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहणारे निखिल मोरे यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी चार अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन तो दिवस संस्मरणीय केला. त्यांच्या या निर्णयामुळे पालिकेतील कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    निखिल मोरे यांनी कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेतले. अतिवृष्टीच्या काळात त्यांनी दाखवलेली तत्परता, पालखी सोहळ्यादरम्यान केलेले नियोजन आणि अडचणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना दिलेली साथ यामुळे ते कर्मचारी वर्गाच्या जवळचे अधिकारी ठरले. याशिवाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून ते काम मार्गी लावले.

    निखिल मोरे यांची बदली पुणे महानगरपालिकेत उपायुक्त पदावर झाली असून, त्यांच्या जागी निखिल जाधव यांनी फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.

No comments