गंधवार्ता न्यूज इम्पॅक्ट - कॅनॉलमध्ये विसर्जित गणेशमूर्तींची होत असलेली विटंबना थांबली
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ सप्टेंबर २०२५ - नीरा उजवा कॅनॉलमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती उघड्यावर पडून राहिल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धेने विसर्जित केलेल्या बाप्पांच्या मूर्तींची अशा प्रकारे विटंबना होऊ नये, अशी मागणी भक्तांकडून होत होती.
गंधवार्ता न्यूजने "नीरा उजवा कॅनॉलमध्ये विसर्जित गणेशमूर्ती उघड्यावर ; भक्तांमध्ये नाराजी" या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. नीरा उजवा कॅनॉलमधील पाणी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या मूर्ती प्रशासनाने बाहेर काढून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली.
यामुळे गणेशमूर्तींची होत असलेली विटंबना थांबली असून, भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गंधवार्ता न्यूजच्या बातमीमुळे योग्य ती कारवाई घडवून आणली गेली, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
No comments