सौ.वैशालीताई सुधीर अहिवळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीच्या सदस्यपदी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ ऑगस्ट २०२५ - फलटण शहर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीच्या सदस्यपदी येथील माजी नगरसेविका सौ.वैशालीताई सुधीर अहिवळे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या दक्षता समिती च्या पदसिद्ध अध्यक्षपदी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील असून सदस्य म्हणून उपविभागिय पोलीस अधिकारी, तहसिलदार डॉ. अभिजित जाधव माजी नगरसेवक सचिन अहिवळे आणि सनी घनश्याम काकडे हे असून त्यांच्या निवडी बद्दल विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व फलटण पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरशिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे व माजी नगरसेविका सौ.वैशालीताई अहिवळे यांनी नागरिकांना नेहमीच मदतीचा हात दिला असून, मंगळवार पेठेत रस्ते,पाणी,गटार व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यामुळे त्यांच्या कामाच्या अनुभवाचा संपूर्ण फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला नक्कीच फायदा होणार आहे.

No comments