फलटण शहर व तालुक्यात लाडक्या बाप्पांचे उत्साहात स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ ऑगस्ट २०२५ - गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात, पारंपरिक वाद्य व डीजेच्या दणक्यात, गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे फलटण मध्ये जल्लोषात स्वागत केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाचे स्वागत करुन, गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्याचप्रमाणे नागरिकांनी परंपरेप्रमाणे आपल्या घरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली.
फलटण शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दीचा माहोल होता. गणेश मूर्तीची विक्री दुकाने माळजाई परिसरात हलवल्यामुळे या परिसरात गणेश भक्तांनी गर्दी केली होती. बाजारपेठेमध्ये गणेशोत्सव आरास, नारळ, हार, फुले, दुर्वा केवडा, कमळ, तसेच पूजेचे साहित्य दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती.
घरातील छोट्या बालकांसमवेत अगदी दुचाकी व रिक्षा व चारचाकी वाहनातून गणपती बाप्पा घरी पोहोचत होते. त्याची उत्सुकता सर्वत्र दिसून येत होती, सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींच्या शहरातून देखण्या मिरवणुका काढण्यात आल्या.
No comments