Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून बैठक - जब्रेश्वर मंदिर परिसरात गणेशोत्सव मिरवणूकीवेळी स्पीकर वाजविण्यास प्रतिबंध

Administration holds meeting on the backdrop of Ganeshotsav - Ban on playing speakers during Ganeshotsav procession in Jabreshwar temple area

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - गणेशोत्सव, २०२५ हा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधीतांशी समन्वय साधण्यासाठी  दि.२५/०८/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता वाजता पंचायत समिती सभागृह, फलटण येथे मा. डॉ. अभिजीत जाधव, तहसीलदार, फलटण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहभागी मंडळे व इतर संबंधीतांचे अभिप्राय जाणुन घेण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक यांच्याकडुन ध्वनी प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव सांगीतली.

    गणेशोत्सव काळात दि.२८/०८/२०२५, दि.३१/०८/२०२५, दि.०२/०९/२०२५, दि.०५/०९/२०२५ आणि दि.०६/०९/२०२५ रोजी सण व उत्सवांच्या दिवसांसाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक सकाळी ०६.०० वाजल्या पासुन ते रात्री १२.०० वाजेपर्यंत सूट देण्याचे आदेश पारीत केले आहेत.

    श्री जब्रेश्वर मंदिर येथे सन २०२४ मधील गणेशोत्सवावेळी वाद्य वादनावर बंदी घातली होती. या वर्षी सुध्दा या अनुषंगाने श्रीमती प्रियांका आंबेकर, उपविभागीय दंडाधिकारी, फलटण उपविभाग, फलटण यांनी खालील आदेश निर्गमित केले आहेत.

    १) श्री जब्रेश्वर मंदिर, फलटण शहर येथील आसपासचा परिसर म्हणजेच गजानन चौकातील मोदी बिल्डींग ते श्री राम मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार, फलटण या रस्त्यावर दिनांक २७/०८/२०२५ ते दि.०६/०९/२०२५ या कालावधी मध्ये श्री गणेशोत्सव मिरवणूकीवेळी कोणतेही स्पीकर यंत्रणा वाजविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

    २) तसेच श्री जब्रेश्वर मंदिराच्या वास्तूला व पुरातन शिल्पांना कोणतीही हानी होईल, असे कृत्य करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

    कलम ३७ (१) (३) महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये मा. जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी निर्गमित केलेल्या य प्रसिध्दीस दिलेल्या आदेशाची प्रत उपस्थित मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या जागरुकतेसाठी देण्यात आली.

    गणेशोत्सव हा विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

    खालील नमुद केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपक वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

    अ - औद्योगिक क्षेत्र ७५ डेसीबल मर्यादा,ब - वाणिज्य क्षेत्र ६५ डेसीबल मर्यादा, क - निवासी क्षेत्र ५५ डेसीबल मर्यादा, ड - शांतता क्षेत्र ५० डेसीबल मर्यादावर दर्शविले नामांकणापेक्षा १० डेसीबलने आवाजाची तिव्रता अधिक असल्यास, ध्वनी प्रदुषण कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. या सभेवेळी ध्वनी प्रदुषणामुळे होणारे परिणाम आणि कायदेशीर तरतुदी सांगण्यात आल्या.

    वाद्यांचा अनियंत्रीत वापराशी तुलना करण्यासाठी सर्वसाधारण कालावधीतील आचाजाची तिव्रता मोजण्यासाठी आज दि.२५/०८/२०२५ रोजी पोउपनिरी. दिनेश शिंदे, पोह. अमोल रनवरे, पोशि. मुकेश घोरपडे तसेच दोन पंचासहीत असलेले पथक फलटण शहरातील प्रमुख ठिकाणांचे नॉईल लेव्हल मिटरने आवाजाची पातळ मोजण्याचे काम सुरु आहे.

    महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्री गणराया अॅवार्ड बाबत कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेडचे श्री रविंद्र ननावरे यांनी सांगीतले की, महावितरणाकडून तात्पुरते वीज कनेक्शन घेणे, मिरवणूक रथाची उंची १२ ते १५ फूट ठेवणे, मीटर सोबत RCCB बसवणे, जेणेकरुन बीज प्रवाहाचा धक्का बसणार नाही. तसेच मिरवणूक रथावर काणीही बसू नये, असे जाहीर आवाहन केले.

    कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी कळविले आहे की, गणपती विसर्जन दि.०६/०९/२०२५ रोजी होणार असून नीरा उजवा कालवा हा दि.०८/०९/२०२५ रोजी कालवा मुखाशी बंद होणार आहे. नीरा उजचा कालव्यामध्ये ज्या मोठ्या गणपतीच्या मूर्ती विसर्जन केल्या जातात, त्या विरघळण्यासाठी जास्त कालावधी लागतो. कालवा मुखाशी बंद केल्यानंतर गणपतीच्या मुर्ती उघड्या पडल्यामुळे मुर्तीची विटंबना होणेची शक्यता नाकारता येत नाही. तरी कालथा बंद झाल्यावर सर्व गणपतीच्या मुर्ती एकत्रित करुन विसर्जन करण्यात याव्यात.

    या पार्श्वभूमीवर श्री निखील मोरे, मुख्याधिकारी, फलटण नगरपालीका यांनी सांगीतले की, श्री गणेश च्या मोठ्या मुर्ती फलटण नगर पालीकेकडे दिल्यास, त्याबाबत श्रध्दापूर्वक पुढील योग्य कार्यवाही केली जाईल.

    सदर बैठकीस डॉ. अभिजीत जाधव, तहसीलदार, फलटण,  श्री निखील मोरे, मुख्याधिकारी, फलटण नगरपालीका, श्री हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे, श्रीमती स्वाती चव्हाण, निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग,  श्री रचिद्र ननावरे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व आवाहन केले. बैठकीस फलटण तालक्यातील अनेक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी समाजातील मान्यवर पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक, अन्य प्रशासकीय अधिकारी पत्रकार उपस्थित होते.

No comments