माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे निधन
Adv. Baburao Gawade passes away
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑगस्ट २०२५ - गोखळी गावचे सुपुत्र व फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच फलटण बार असोसिएशन चे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. बाबुराव शंकरराव गावडे यांचे आज दि.२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात भाऊ- भावजय, मुले,मुली-सून,नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार होता. त्यांच्यावर मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता गोखळी ता.फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments