मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावे बनावट फेसबुक काढणाऱ्या इसमाला अटक
सातारा (दिनांक 27 प्रतिनिधी)- राज्याची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढून त्याद्वारे इतरांना पैसे मागणारा इसमाला वडूज पोलिसांनी अटक केली आहे .वैभव प*** पानसकर राहणार सूर्याची वाडी तालुका खटाव मूळ राहणार गोकुळ तालुका खटाव या इसमाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
ग्राम विकास व पंचायतराज मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्या नावे खोटे फेसबुक खाते उघडून त्या खात्याच्या माध्यमातून इतरांना मेसेज द्वारे पैशाची मागणी करण्यात आली होती या फेसबुक खात्यावर प्रोफाइलला जयकुमार गोरे यांचा फोटो लावण्यात आला होता याप्रकरणी वडूज पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 प्रमाणे आज्ञातीसमोर गुन्हा दाखल केला होता पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास केला पोलिसांनी तांत्रिक कौशल्य व इतर माहितीच्या आधारे सूर्याची वाढ येथील एका इसमाला अटक केली होती वैभव पानसकर यांनी हा प्रकार केल्याचे तांत्रिक तपासत स्पष्ट झाले पानस्कर यांनी या खात्याच्या आधारे काही महिलांना व इतरांना मेसेज करून पैशाची मागणी केल्याची स्पष्ट झाले या प्रकरणाची अधिक विस्ताराने माहिती घेण्यात येत आहे .या तपासात पोलीस हवालदार शिवाजी खाडे किरण चव्हाण पुंडलिक कटरे विजय खाडे 57 खाडे यांनी भाग घेतला होता.

No comments