अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ ऑगस्ट २०२५ - फलटण तालुका अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या समितीमध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, माजी नगरसेविका सौ. वैशालीताई अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे व सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
फलटण तालुका अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील असून सदस्य म्हणून उपविभागिय पोलीस अधिकारी, तहसिलदार डॉ.अभिजित जाधव, माजी नगरसेविका सौ. वैशालीताई अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे व सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी जाहीर झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांचे विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments