ॲड. बाबुराव गावडे यांच्यावर गोखळी येथे अंत्यसंस्कार
गोखळी (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव शंकरराव गावडे ( ७६) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर गोखळी ता.फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गोखळी येथील निवासस्थानापासून निघालेल्या अंत्य यात्रेत सातारा, पुणे , सांगली,सोलापूर, अहमदनगर येथील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय आणि वकिली क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
ॲड. बाबुराव शंकरराव गावडे यांनी नगराध्यक्ष म्हणून फलटण शहरातील विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारण, वकीली आणि नोटरीच्या माध्यमातून नागरीकांना कायदेविषयक सेवा दिली. एक अभ्यासू मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक विवाहित मुलगा,सुन,एक विवाहित भाऊ,भावजय,तिन विवाहित बहिणी,पुतणे सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ वैशालीताई बापूराव गावडे यांचे चुलत सासरे, पोलिस निरीक्षक महेंद्र गावडे आणि, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे यांचे ते चुलते होते.

No comments