गोवंशीय सदृश्य गाईंची वाहतुक व कत्तल ; ७ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ ऑगस्ट २०२५ - कुरेश नगर फलटण येथे गोवंशीय सदृश्य गाईंची वाहतुक करून राहते घराचे पहिल्या मजल्यावरती गोवंशीय सदृश्य गाईंची कत्तल केल्याप्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 7 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि.23/08/2025 रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा येथे महिला नामे सायरा रफीक कुरेशी व इसम नामे- वसीम रफीक कुरेशी यांनी त्यांचे घरातील कौटुंबिक कार्यक्रमाकरीता पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्र. MH -13 AC -2324 व पांढऱ्या रंगाचा सुपर कॅरी सी.एन.जी. छोटा हत्ती क्र. MH -11- DD -5530 मधुन गोवंशीय सदृश्य गाईंची वाहतुक करून त्यांचे राहते घराचे पहिल्या मजल्यावरती गोवंशीय सदृश्य गाईंची कत्तल केली आहे. तसेच बिलाल कुरेशी हा हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सातारा यांचे न्यायालयात क्र. स्था.गु.शा.11/2024 म.पो.का.क.55/2992/24, दि. 27/11/2024 प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका व पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यातुन दोन वर्षे करीता हद्दपार असताना सुध्दा त्याने फलटण शहरात प्रवेश करून गाईंची कत्तल करणेकरीता मदत केली आहे. तसेच यातील आरोपी वसीम कुरेशी हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी 1) 20,000/- रुपये किंमतीची दोन गोवंशीय सदृश्य जातीच्या जनावरांचे मांस व कातडी 2) 3,50,000/-रुपये किंमतीची स्कॉरपिओ तिचा आर.टी.ओ. क्र.MH -13 AC -2324 3) 4,00,000/-रुपये किंमतीचा पांढ-या रंगाचा सुपर कॅरी सीएनजी (स्थानिक नाव :- छोटा हत्ती) क्र.MH-11-DD-5530 4) 7,000/- रुपये किंमतीची चार मोठी अल्युमिनियम ची पातेली (डेग) असा एकूण 7 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार पुनम वाघ या करीत आहेत.
या कारवाईत सपोनि नितीन शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो. हवा. संदीप लोंढे, पूनम वाघ, माधवी बोडके, पूनम बोबडे, रुपाली भिसे, नितीन सजगणे, पो. शि. जितेंद्र टिके, काकासो कर्णे, अतुल बडे, सूरज परिहार, स्वप्नील खराडे यांनी सहभाग घेतला.
No comments