गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर दंगा काबू योजना प्रात्यक्षिक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ ऑगस्ट २०२५ - आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा सज्ज राहावी यासाठी दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 5.45 वा. ते 7.10 वा. या वेळेत फलटण विमानतळ येथे दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकावेळी श्री. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई (अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण उपविभागातील 6 पोलीस अधिकारी, 36 पोलीस अंमलदार तसेच एक आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.
प्रात्यक्षिकाद्वारे विविध परिस्थितींमध्ये पोलीस दल कशाप्रकारे तात्काळ कार्यवाही करेल याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. येणारे उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावेत यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याचा संदेश या सरावातून देण्यात आला.
No comments