साताऱ्यात ११ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
![]() |
सातारा येथे बुधवारी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांची ब्रेथ अनालायझर मशीनने मद्य प्राशन केले आहे की नाही याची 'तपासणी केली. |
सातारा, (दि. २१ ऑगस्ट, २०२५) - अवैध प्रवाशी वाहतूक व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षाचालकांची बुधवारी वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये अकरा रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवून बुधवारी शहरात रिक्षाचालकांची तपासणी सुरू केली. मद्यप्राशन करून कोणी रिक्षा चालवताहेत का, याचीही ब्रिथ अनालाझर मशीनने तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक रिक्षाची कागदपत्रे, परवाना, फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात आले. शहरातील राजवाडा, गोलबाग, राधिका चौक, मोळाचा ओढा, बसस्थानक, पोवईनाका आदी ठिकाणी पोलिसांनी तब्बल ८० रिक्षांची तपासणी केली. यामध्ये पासिंग नसलेले व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या ११ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव, पोलिस उपनिरीक्षक एस. डी. जाधव, पिसाळ, हवालदार योगेश जाधव, चंद्रकांत टकले, विजय साळुंखे, मनोहर वाघमले, सचिन नवघणे आदींनी या कारवाई भाग घेतला.
No comments