Breaking News

नाईकबोमवाडी एमआयडीसीसह माढा मतदारसंघाच्या विकासकामांना गती मिळणार - रणजितसिंह नाईक निंबाळकर

`
Development works of Madha constituency including Naikbomwadi MIDC will get momentum - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ ऑगस्ट २०२५ - नाईकबोमवाडी एमआयडीसीसह माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. 

    या भेटीत अनेक महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये - नाईकबोमवाडी व म्हसवड एमआयडीसीला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळावा, मुंबई–बंगलोर महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणी, तसेच फलटण–पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण व्हावा, यासाठी पंतप्रधानांकडे निवेदन सादर करण्यात आले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले असून, आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    यामुळे माढा मतदारसंघातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments