फलटण नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर ; इच्छुकांमध्ये कही खुशी - कही गमचे वातावरण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ ऑगस्ट २०२५ - फलटण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारूप प्रभाग रचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, अनेकजण या प्रभाग रचनेबाबत बुचकळ्यात पडले आहेत. हा आराखडा नक्कीच राजकीय आखाडा बनणार असून राजे गट विरुद्ध खासदार गट त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीकडून सुद्धा चाचपणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, बदललेल्या प्रभाग रचनेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी - कही गमचे वातावरण आहे. प्रभाग रचनेबाबत हरकती 31 ऑगस्ट पर्यंत स्वीकारल्या जाणार असल्याचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान यावेळी एक प्रभाग वाढला असून एकूण २७ नगरसेवक व एक थेट नगराध्यक्ष होणार आहे, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी प्रभाग रचना झाली आहे.त्यामुळेच "अँटी इनकंबंशी" चा फटका बसणारे मात्र नगरसेवक नक्कीच सुटकेचा श्वास घेत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग रचनेबाबत पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
प्रभाग 1 - व्याप्ती - नगर परिषद पाणीपुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, लक्ष्मी मरिमाता मंदिर सोमवार पेठ संपूर्ण, श्रीराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर
उत्तर - बाणगंगा नदी पूर्व किनारा उत्तरेकडील नगरपरिषद हद्द, सस्तेवाडी रस्ता ते खडकहिरा नाला पूर्व - नगरपरिषद हद्द, खडकहिरा नाला
दक्षिण - खडकहिरा नाला ते भोईटे हॉस्पिटल समोरील रस्ता ते रिंग रोड शिंदे हॉस्पिटल समोरील रस्ता ते रिंग रोड क्रांतीसिंह नाना पाटील चौक नीरा उजवा कॅनल ची उत्तर बाजूने बाणगंगा नदी आठमोरी पुलापर्यंत
पश्चिम - बाणगंगा नदी पूर्व किनार बाजू नीरा उजवा कॅनल ची उत्तर बाजू उत्तरेकडे नगरपरिषद हद्द
प्रभाग 2 - व्याप्ती - मंगळवार पेठ परिसर बस स्थानक समोरील परिसर, पुणे रस्ता परिसर
उत्तर - मोहम्मद फजल सामाजिक सभागृह ते नीरा उजवा कालवा पर्यंत
पूर्व - निरा उजवा कालव्याच्या उत्तर बाजूने बारामती पूल ते पंढरपूर पूल
दक्षिण - पंढरपूर पूल क्रांतीसिंह नाना पाटील चौक छ. शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विठ्ठल मंदिर अप्सरा दुकान विनय ज्वेलर्स शेजारून सह्याद्री फर्निचर सिमेंट रोड जुना बारामती चौक टेंगुळ चौक मटन मार्केट मागील रस्ता नगरपरिषद शाळा च बुद्धविहार यांच्या समोरील रस्ता जुन्या चावडी कडे जाणारा रस्ता
पश्चिम - नीरा उजवा कालवा मोहम्मद फजल सामाजिक सभागृह ते रज्जाक घर ते सलाउद्दीन कुरेशी घर ते बिस्मिल्ला हॉटेल ते संविधान बंगला बुद्धविहार शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चावडी जुन्या चावडी कडे जाणारा रस्ता ते धम्मयान चौक ते शालन निवास मटन मार्केट मागील रस्ता
प्रभाग 3 - व्याप्ती - आखरी रस्ता पूर्व बाजू, नायरा पेट्रोल पंप परिसर २ उर्दू शाळा. कुरेशी मस्जिद परिसर, बुरूड गल्ली, जुने सभापती निवास समोरील बाजू, खाटिक गल्ली, परिट गल्ली, कुंभार टेक
उत्तर - स्मशान भूमी बाजूकडील नीरा उजवा कालवा
पूर्व - नीरा उजवा कालवा मोहम्मद फजल सामाजिक सभागृह ते रज्जाक घर ते सलाउद्दीन कुरेशी घर ते बिस्मिल्ला हॉटेल ते संविधान बंगला बुद्धविहार शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चावडी जुन्या चावडी कडे जाणारा रस्ता ते धम्मयान चौक ते शालन निवास ते अजमुद्दीन दुकान (मेहबूबा बंगला। सिमेंट रोड सुशील निवास ते सईबाई सभागृह ते जय भारत चौक ते शिराळकर कापड दुकान ते शिवशक्ती चौक पर्यंत
दक्षिण- शिवशक्ती चौक ते नरसिंह चौक ते हंपे किराणा दुकान समोरील बोळ ते धोंडीराम निवास ते गोविंद कमल बंगला ते शिवानी गिफ्ट हाउस गोल्डन बेकरी रोड ते बादशाही मस्जिद समोर
पश्चिम - बादशाही मस्जिद समोरील रस्ता बुरूड गल्ली ते पाचबत्ती चौक ते आखरी रस्ता ते अण्णाभाऊ साठे कमान ते जाधव घर ते अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन शेजारी बोळ, कुरेशी घर ते वीटभट्टी शेजारून नदिकडे जाणारा रस्ता
प्रभाग 4 - व्याप्ती - आखरी रस्ता पश्चिम बाजू पठाणवाडा, पाचबत्ती चौक लाटकर तट्टी. शनी मंदिर हरीहरेश्वर मंदिर . वेलणकर दत्त मंदिर चांदतारा मस्जिद, जैन मंदिर, दगडी पूल परिसर
उत्तर - जाधव घर ते अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन शेजारी बोळ, कुरेशी घर ते वीटमट्टी शेजारून नदिकडे जाणारा रस्ता
पूर्व- अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन जाधव घर आखरी रस्ता अण्णाभाऊ साठे कमान पाचबत्ती चौक ते बुरूड गल्ली चावडी पर्यंत (पालखी मार्ग) राम मंदिर शेजारील रस्ता ते शंकर मार्केट ते ब्राह्मण गल्ली वरद अपार्टमेट शिवकृपा अपार्टमेंट मलठण वेस ते शिव पार्वती सदन ते अॅड. निरज केसकर यज्ञ बंगला गणेश अपार्टमेंट ते हरिहरेश्वर मंदिर दादामहाराज म्ठ ते क्षीरसागर वडा सरस्वती सदन डॉ. उत्कर्ष गांधी घराशेजारील बोळातून व्यंकटेश विद्यालय मागील बाजू माने घर ते पराडकर प्रेस कडे खानविलकर घरापासून कर्वे गल्ली कडे ते हनुमान मंदिर समोरून दगडी पूल सर्वज्ञ बंगला पर्यंत दगडी पूल सर्वज्ञ बंगला ते घवल बंगला ते सामाजिक सभागृह स्वामी समर्थ मंदिर से अंडीवाला छोटा रस्ता गवळी वाडा मागून श्री कृष्ण मंदिर शेजारून बाणगंगा नदीपर्यंत श्री कृष्ण मंदिर शनी मंदिर पठाणवाडा बाणगंगा नदी हद्द
प्रभाग 5 -
व्याप्ती - श्रीमंत मालोजीराजे शेती विदयालय. शेती शाळा परिसर, जिंती नाका गोसावी वस्ती परिसर. बाणगंगा नदी हद्द. पुणे रोड परिसर आईसाहेब मंदिर, हरीबुवा मंदिर, महादेव मंदिर, उंबरेश्वर चौक, स्वामी समर्थ मंदिर इंदिरानगर वसाहत
उत्तर - साखरवाडी जिंती चौधरवाडी रस्त्यावरुन नगरपरिषद हद्दीच्या उत्तर बाजूने
पूर्व - उत्तर बाजूच्या नगरपरिषद हद्दीपासून बाणगंगा नदीच्या पूर्व किनार बाजूने हरीबुवा मंदिर परिसर मलठण वेस पुलापर्यंत
दक्षिण - बाणगंगा नदी हद्द. गणेशनगर, मलठण वेस पूल, स्वामी कृपा फर्निचर्स थोरात घराबाजूचा लोहार गल्ली सिमेंट रस्ता ते लोंढे घरासमोरील चौक ते कारंजाकडे जाणारा रस्ता. उंबरेश्वर चौक प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल चौक
पश्चिम - प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल चौक ते सदानंद निवास युवराज शिंदे घर नाना शिंदे घर न्यू पुना इंजिनीअर ते अमरहिंद क्रीडा मंडळ चौक संतोषी माता मंदिर मार्ग शौर्य रंजन हॉस्पिटल शिंगाटे मेस मातोश्री मार्ग सुजल अॅक्वा कोहिनूर इन्स्टिट्यूट दोशी अॅटो सर्व्हिस स्टेशन मागील पालखी रस्ता ते सिद्धिविनायक मंदिर ते महादेव मंदिर जिंती नाका जिंती रोड कॅनल पट्टी श्री गणेश इंटरप्रायझेस दुकान ते साखरवाडी जिंती रस्त्यावरून नगरपरिषद हद्द
प्रभाग 6 - व्याप्ती -
रस्त्यावरून नगरपरिषद हद्द संतोषी माता मंदिर परिसर सगुनामाता नगर साईबाबा मंदिर, श्रीकृष्ण बेकरी परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर. निमकर सीडस, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर
उत्तर - नीरा उजवा कालवा
पूर्व - सदानंद निवास, नाना शिंदे घर, न्यू पुना इंजिनीअर ते अमरहिंद क्रीडा मंडळ चौक संतोषी माता मंदिर मार्ग, शौर्य रंजन हॉस्पिटल, शिंगाटे मेस, मातोश्री मार्ग, सुजल अॅक्वा कोहिनूर इन्स्टिट्यूट, दोशी अॅटो सर्व्हिस स्टेशन मागील पालखी रस्ता ते सिद्धिविनायक मंदिर ते महादेव मंदिर जिंती नाका जिंती रोड कॅनल पट्टी श्री गणेश इंटरप्रायझेस दुकान ते साखरवाडी जिंती रस्त्यावरून नगरपरिषद हद्द
दक्षिण - अमरहिंद क्रीडा मंडळ पश्चिमेकडील जाणारा रस्ता ते श्रीशा इंटरप्रायझेस ते पश्चिमेकडे नगरपरिषद हद्दीपर्यंत
पश्चिम - नीरा उजवा कालवा पुणे रोड ने नगरपरिषद हद्द
प्रभाग 7 - व्याप्ती -
संत बापुदास नगर, हनुमान नगर सातारा रस्ता दोन्ही बाजू. मुधोजी कॉलेज परिसर, जिनिंग मिल, कुंभार भट्टी परिसर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, रंगारी महादेव मंदिर परिसर, श्री चक्रपाणी जन्म स्थान मंदिर परिसर, काळूबाई मंदिर परिसर, प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल परिसर
उत्तर - स्वामी कृपा फर्निचर्स थोरात घर बाजूचा लोहार गल्ली सिमेंट रस्ता, उंबरेश्वर चौक लोंढे घरासमोरील चौक ते कारंजाकडे जाणारा रस्ता प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल चौक ते सदानंद निवास युवराज शिंदे घर नाना शिंदे ते न्यू पुना इंजिनीअरिंग कडे जाणारा रस्ता अमरहिंद क्रीडा मंडळ पश्चिमेकडील जाणारा रस्ता ते श्रीशा इंटरप्रायझेस ते पश्चिमेकडे नगरपरिषद हद्दीपर्यंत
पूर्व - मुधोजी कॉलेज लेडीज होस्टेल समोरील बाजू दत्तनगर चौक, जिनिंग कंपाऊंड ते सातारा रस्ता जुने ग्रामीण पोलीस स्टेशन ते रंगारी महादेव मंदिर चौक द्वारामतीकार मठपती मठ बोळ पिंपळेश्वर हनुमान मंदिर अवस्थान मैदान बाणगंगा नदी पूर्व बाजू मलठण वेस पूल
दक्षिण - पिरॅमिड चौक पासून मुधोजी कॉलेज लेडीज होस्टेल मुधोजी कॉलेज कंपाऊंड ने बाणगंगा नदीची पश्चिम बाजू नगरपरिषद हद्द
पश्चिम - पश्चिमेकडील नगरपरिषद हद्द सातारा रस्त्याकडील नगरपरिषद हद्द संत बापूदास नगर कडील नगरपरिषद हद्द
प्रभाग 8 - व्याप्ती - ब्राह्राण गल्ली शंकर मार्केट परिसर, नगरपरिषद २ आरोग्य केंद्र, पराडकर प्रेस नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ परिसर, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा, श्रीकृष्ण मंदिर
उत्तर - अंडीवाला बोळ धवल बंगला दगडी पूल सर्वज्ञ बंगला कर्वे गल्ली तून पराडकर प्रेस व्यंकटेश विद्यालय मागील बाजू सरस्वती सदन ते हरिहरेश्वर मंदिर दादामहाराज मठ ते अॅड. निरज केसकर यज्ञ बंगला गणेश अपार्टमेंट ते शिव पार्वती सदन ते मलठण वेस ते शिव कृपा अपार्टमेंट ते वरद अपार्टमेंट ते शंकर मार्केट चौक ते राम मंदिर मागील रस्ता पालखी मार्ग
पूर्व- स्वामी समर्थ मंदिर गजानन चौक जबरेश्वर मंदिर पालखी मार्गाने श्रीराम मंदिर पर्यंत
दक्षिण - रंगारी महादेव मंदिर, बारस्कर गल्ली चौक णमोकार इंटरप्रायझेस मारवाड पूल जुना सातारा रस्त्याने नवलबाई मंगल कार्यालय पर्यंत नवलबाई मंगल कार्यालय मागील छोट्या रस्त्याने शनिवारवाडा स्वामी समर्थ मंदिर गजानन चौक
पश्चिम - रंगारी महादेव मंदिर चौक ते द्वारामतीकार मठपती मठ मागील बोळ ते पिंपळेश्वर हनुमान मंदिर अवस्थान मैदान, बाणगंगा नदी पश्चिम बाजू श्रीकृष्ण मंदिर
प्रभाग 9 - व्याप्ती - गजानन चौक परिसर ज्योतीचंद भाईचंद सराफ दुकान परिसर पवार गल्ली नगर परीषद परिसर उमाजी नाईक चौक परिसर मेटकरी गल्ली उघडा मारुती मंदिर परिसर, मटन मार्केट मच्छी मार्केट परिसर, रविवार पेठ तालीम परिसर
उत्तर- बादशाही मस्जिद, गोल्डन बेकरी समोरील रस्ता. शिवानी गिफ्ट हाऊस गोविंद कमल बंगला. धोंडीराम निवास हंपे किराणा दुकान समोरील बोळ नरसिंह चौक शिवशक्ती चौक जय भारत चौक, शिराळकर कापड दुकान सईबाई सभागृह सुशील निवास सिमेंट रस्ता ते अजमुद्दिन दुकान ते मटन मार्केट मागील रस्ता टेंगुळ चौक (जुना बर्फ कारखाना चौक) ते बारामती चौक ते सह्याद्री फर्निचर सिमेंट रस्ता
पूर्व - महावीर स्तंभ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठ्ठल मंदिर अप्सरा ड्रेसेस विनय ज्वेलर्स शेजारून सह्याद्री फर्निचर सिमेंट रोड
दक्षिण - महावीर स्तंभ उमाजी नाईक चौक, गजानन चौक
पश्चिम - बादशाही मस्जिद, पालखी मार्गान श्रीराम मंदिर
प्रभाग 10 - व्याप्ती - बसस्थानक, घडसोली मैदान शिंगणापूर रस्ता पृथ्वी चौक (अहिल्यादेवी चौक), शिवाजीनगर खर्डेकर विद्यालय परिसर, रिंग रोड उत्तर बाजू. नामजोशी पेट्रोल पंप मागील परिसर सुविधा हॉस्पिटल परिसर, जलमंदिर परिसर
उत्तर - भोईटे हॉस्पिटल समोरील रस्ता ते रिंग रोड शिंदे हॉस्पिटल समोरील रस्ता ते रिंग रोड क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते छ. शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
पूर्व - खडकहिरा नाला नगरपरिषद हद्द ते स्पंदन हॉस्पिटल रस्ता रिंग रोडने
दक्षिण - शिंगणापूर रस्ता नगरपरिषद हद्द खडकहिरा नाला नगरपरिषद हद्द स्पंदन हॉस्पिटल समोरील रस्ता रिंग रोड कर्नल निकम बँक पर्यंत
पश्चिम- रिंग रोड डॉ. निंबाळकर हॉस्पिटल जॉकी स्टोअर समोरील रस्ता ते कर्नल निकम बँक ते जाधव घर डॉ जोशी हॉस्पीटल रस्ता ते शिवांजली हॉटेल ते ब्रम्हचैतन्य मेडिकल भोसले वकील बंगला उपळेकर मंदिर समोरून महावीर स्तंभ ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
प्रभाग 11 - व्याप्ती - रायगड हॉटेल परिसर, प्रा. शिवाजीराव भोसले घर परिसर महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसर, माळजाई मंदिर परिसर जायका हॉटेल परिसर पॉकेट कॅफे परिसर, सिटी प्राईड परिसर, नारळी बाग परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, उपळेकर महाराज मंदिर परिसर, जोशी हॉस्पिटल परिसर, जुनी एम एस ई बी कॉलनी, प्रशासकीय इमारत परिसर डी. एड. चौक बंटीराजे खर्डेकर घर परिसर
उत्तर- गजानन चौक, उमाजी नाईक चौक, महावीर स्तंभ, उपळेकर मंदिर पर्यंत
पूर्व- रिंग रोड डॉ. निंबाळकर हॉस्पिटल जॉकी स्टोअर समोरील रस्ता ते कर्नल निकम बँक ते जाधव घर डॉ जोशी हॉस्पीटल रस्ता ते शिवांजली हॉटेल ते ब्रम्हचैतन्य मेडिकल भोसले वकील बंगला उपळेकर मंदिर समोरून महावीर स्तंभ
दक्षिण- इरिगेशन कॉलनी कंपाउंड पोलीस कॉलनी कंपाउंड गिरवी नाका ते फलटण लॉ कॉलेज गिरवी नाका रिंग रोड ने कोणार्क बिल्डर्स बेडके घर मागील बाजू ओनेला बंगला भोईटे बंगला मागील बाजू गोविंद अपार्टमेंट सलीम शेख घर समोरील रस्ता vs ग्रुप बिल्डींग ते आर्यमान हॉटेल
पश्चिम - गिरवी नाका ते फलटण लॉ कॉलेज इरिगेशन कॉलनी कंपाऊंड पोलीस कॉलनी कंपाऊंड विश्वप्रिया बंगला ते शिवगड अपार्टमेंट श्री हाईटस सोसायटी ते स्वामी बंगला ते बालाजी बझार ते चक्रपाणी किराणा दुकान ते नगरपालिका सांस्कृतिक भवन ते कामगार कॉलनी चौक खजिना हौद मागील रस्त्याने चोरमले बोळातून
प्रभाग 12 - व्याप्ती - स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, आबासाहेब मंदिर मागील बाजू, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर, कामगार कॉलनी खजिना हौद मागील परिसर
उत्तर - जुने ग्रामीण पोलीस स्टेशन, जुना सातारा रस्ता रंगारी महादेव मंदिर, बारस्कर गल्ली चौक णमोकार इंटरप्रायझेस मारवाड पूल जुना सातारा रस्त्याने नवलबाई मंगल कार्यालय पर्यंत नवलबाई मंगल कार्यालय मागील छोट्या रस्त्याने शनिवारवाडा चोरमले छोट्या रस्त्याने खजिना हौद मागील बाजू
पूर्व - खजिना हौद मागील बाजू कामगार कॉलनी चौक ते नगरपालिका सांस्कृतिक भवन ते चक्रपाणी किराणा दुकान ते बालाजी बझार स्वामी बंगला ते श्री हाईटस सोसायटी शिवगड अपार्टमेंट विश्वप्रिया बंगला
दक्षिण - विश्वप्रिया बंगला पोलीस कॉलनी कंपाउंड ने सातारा रस्ता
पश्चिम - सातारा रस्ता दत्तनगर चौक जिनिंग मिल कंपाउंड ने जुने ग्रामीण पोलीस स्टेशन
प्रभाग 13 - व्याप्ती - पदमावतीनगर, भडकमकर नगर, पोलिस स्टेशन कॉलनी, संजीवराजे नगर परिसर इरिगेशन कॉलनी परिसर हाडको कॉलनी, आनंद नगर, गोळीबार मैदान परिसर, विद्यानगर परिसर, निर्मलादेवी शाळा परिसर महाराजा मंगल कार्यालय परिसर चव्हाण निकम हॉस्पिटल मगर हॉस्पिटल परिसर लक्ष्मीनगर, आर्यमान हॉटेल परिसर, हॉटेल ब्रम्हा परिसर
उत्तर - श्रीखंडे मळा बाणगंगा नदी हद्द मुधोजी कॉलेज लेडीज होस्टेल शेजारून सातारा रस्ता पोलीस कॉलनी कंपाऊंड इरिगेशन कॉलनी कंपाऊंड ते गिरवी नाका रिंग रोड ने कोणार्क बिल्डर्स बेडके घर मागील बाजू ओनेला बंगला भोईटे बंगला मागील बाजू गोविंद अपार्टमेंट सलीम शेख घर समोरील रस्ता vs ग्रुप बिल्डींग ते आर्यमान हॉटेल रिंग रोड ने स्पंदन हॉस्पिटल रस्ता पर्यंत
पूर्व - खडकहिरा नाला नगरपरिषद हद्द, स्पंदन हॉस्पिटल समोरील रस्ता
दक्षिण - पद्मावतीनगर नगरपरिषद हद्द विमानतळ कंपाउंड नगरपरिषद हद्द विचूंर्णी रोड संजीवराजे नगर नगरपरिषद हद्द. खडकहिरा नाला नगरपरिषद हद्द
पश्चिम - मुधोजी कॉलेज कंपाऊंड ने बाणगंगा नदी पर्यंत श्रीखंडे मळा नगरपरिषद हद्दीपर्यंत आहे जाहीर करण्यात आले आहे.
No comments