Breaking News

नीरा देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचाई योजनेत समावेश - रणजितसिंह नाईक निंबाळकर

Neera Deoghar project included in Central Agricultural Irrigation Scheme - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ ऑगस्ट २०२५ -  सन २०१९ मध्ये लोकसभा खासदार झाल्यानंतर केंद्रीय कृषी सिंचाई योजनेत या प्रकल्पाचा समावेश व्हावा, या करिता सातत्याने प्रयत्न केले. यामध्ये सीडब्लूसी ची मान्यता,  धरणाची पाणी साठवण क्षमता (हायड्रॉलॉजी) दाखला , या करिता केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून विशेष समितीस पाचारण करण्यात आले. राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आली आणि अखेर नीरा देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सीडब्लूसीचे चेअरमन अतुल जयंत, सदस्य पाटणकर साहेब, चीफ इंजिनिअर शेंगर साहेब उपस्थित होते.

    यावेळी या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीची मान्यता मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होण्याच्या निश्चितीवर शिक्कामोर्तब झाले. पुढील टप्प्याकरिता लवकरच केंद्रीय निधी उपलब्ध होऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. या बरोबरच उरमोडी व जिहे कटापूर योजनेस ही मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता मिळाली असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे तसेच वर्तमान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व तत्कालीन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंहजी शेखावत तसेच राज्य सरकार कडून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विशेष साथ मिळाली, राज्य सरकारकडून प्रकल्पास केंद्राकडे शिफारस व केंद्रीय निधी उपलब्ध होई पर्यंत राज्याकडून निधी उपलब्ध करून दिला,   सर्वांच्या सहकार्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दल माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.

No comments