फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - काजल ऋतुराज भोईटे यांना इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड तथा दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 केरला स्टोरी टू च्या ॲक्टर उल्का गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अखिलेश सिंग चेअरमन दीपिटा समूह यांच्या सह पद्मश्री काळुराम बमानिया, आर्ट मिडिया ॲडव्हर्टायझिंग प्रमुख सुनील सेठी,व तारक मेहता का उलटा चष्मा टीम उपस्थित होती.हा सोहळा प्रोग्राम हॉटेल सहारा स्टार मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो हा अवॉर्ड काजल ऋतुराज भोईटे यांना मिळाल्याने फलटण चे नाव उज्ज्वल झाले असून फलटण नगरीचे माजी नगराध्यक्ष स्व.नंदू शेठ भोईटे यांच्या त्या स्नुषा असून उद्योजक ऋतुराज भोईटे यांच्या पत्नी आहेत, भोईटे कुटुंबीय हे फलटण तालुक्यातील दानशूर कुटुंब अशी त्यांची ओळख असून व्यवसायात त्यांचे नाव अग्रेसर पने घेतले जाते अशा कुटुंबातील सुनेला काजल ऋतुराज भोईटे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments