Breaking News

कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांचा द्वितीय स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

The second memorial day of late Subhashrao Namdevrao Suryavanshi (Bedke) was observed with various programs

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ -  गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा द्वितीय स्मृतिदिन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

    प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी सर, उपाध्यक्ष सी. एल. पवार सर, संस्थेचे मानद सचिव  डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), माजी प्राचार्य आप्पा शिंदे सर यांच्या हस्ते कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.सौ. तगारे एस. एम. यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू व उद्देश उपस्थितांना सांगितला.

    दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या  वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, काव्यवाचन व गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्य भेट देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्रीणी तगारे, प्रणिती गाडे, प्रेरणा भोईटे,  समीक्षा भिवरकर या स्पर्धकांनी काव्य गायन व वक्तृत्व उपस्थित मान्यवरांसमोर सादर केले.

    विद्यार्थी मनोगतामध्ये प्रशालेची इयत्ता ९ वीतील कु.श्रावणी माधव नाळे या विद्यार्थिनीने आदरणीय काकांविषयी तिचे मत इंग्रजी मधून  व्यक्त केले.

    श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी सर यांनी आपल्या मनोगतातून आदरणीय काकांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला व व संस्थेच्या  शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.

    संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून आदरणीय काकांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत असताना संस्थेच्या वाटचालीविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. आदरणीय काकांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त विविध शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या क्रीडा व विविध स्पर्धा याविषयी त्यांनी कौतुक केले व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला सज्ज ठेवले पाहिजे, हा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून दिला.

    या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन.एम., उपप्राचार्य मा. श्री. घनवट पी.डी., पर्यवेक्षिका सौ. रणवरे सी. आर. यांनी केले. कला शिक्षिका सौ ढेंबरे डी.पी. मॅडम यांनी कार्यक्रमाचे उत्तम फलक लेखन केले.

    या कार्यक्रमाकरिता संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. श्री यादव एस.डी. ,सौ. तगारे एस. एम. यांनी केले तर आभार प्रा. श्री. राऊत एस. एन. यांनी मानले.

No comments