ॲव्होकॅडो फळ उत्पादन फलटण परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व उत्तम पर्याय - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दर्जेदार आव्हाकॅडो फळ उत्पादन संधी व आव्हाने या एक दिवसीय पिक चर्चासत्र दरम्यान आव्होकॅडो फळ उत्पादन फलटण परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व उत्तम पर्याय म्हणून घेण्यात यावे तसेच फलटण तालुक्यातील वातावरन आव्होकॅडो फळ उत्पादनासाठी पोषक असल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, सातारा व सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उद्देशून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी अव्होकॅडो पिकाची पार्श्वभूमी, प्राथमिक माहिती, लागवडी योग्य तंत्रज्ञान, पिक चर्चासत्राची रुपरेषा या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना अनुमोदन केले. कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक यांचा उपस्थितांना परिचय करून दिला. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांचा 80 वा वाढदिवसा निमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
पिक चर्चासत्र कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले गणेश बाबर, व्यवस्थापक, श्लोकाज ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, उडतारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अव्होकॅडो फळाच्या यशस्वी लागवडीसाठी योग्य हवामान, माती, लागवड तंत्रज्ञान, वाणांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, छाटणी व्यवस्थापन, आवोकॅडो उत्पादनातील रूटस्टॉक्स व्यवस्थापन, योग्य पिक व्यवस्थापन तंत्रज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर शेतकऱ्यांच्या आवोकॅडो पिक संबंधित असणाऱ्या शंकाचे निरसन करण्यात आले.
पिक चर्चासत्र कार्यक्रमाला मा. सौ. श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सातारा तथा सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. रणजित निंबाळकर, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. विश्वासदादा गावडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सातारा, श्री. धनंजय पवार, चेअरमन, फलटण दूध सहकारी संघ, श्री. शिरीषशेठ दोशी, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. आर. एच. पवार, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. रामदास कदम, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. अरविंद निकम, प्रशासकीय अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, फलटण परिसरातील शेतकरी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर व कुमारी प्राजक्ता जाधव आणि आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी व्यक्त केले.
No comments