Breaking News

लाडकी बहिण योजनेचा आठ शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांकडून लाभ

Eight female government employees benefit from Ladki Bahin Yojana

    सातारा दि २२ (प्रतिनिधी ) - सरकारी सेवेत असूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या 1 हजार 183 महिला कर्मचार्‍यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या आठजणींचा समावेश आहे. संबंधित कर्मचार्‍यांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

    लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी महिलांचा शोध शासनाने सुरु केला आहे. निकषांची पुर्तता न करणार्‍या महिलांना अपात्र ठरवले जात आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी सेवेतील महिलांचा शोध घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात 1 हजार 183 महिला लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आली आहे. या सर्व महिला सरकारी कर्मचारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत, तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. महिला व बालविकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे. शासनाकडून झेडपीला आलेल्या यादीमध्ये या 8 महिला कर्मचारी सातारा झेडपीच्या असल्याचे समोर आले आहे. या यादीने यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या महिलांवर कोणती कारवाई करायची याचे निर्देश जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त होताच कार्यवाही केली जाणार आहे.

    ‘या’ आहेत शासकीय कर्मचारी

    अश्विनी चंद्रकांत कांबळे, तनुजा बाळू झिमल, सुक्रीया अशोक गुरव, संध्या सतीष कांबळे, प्रतिभा धनंजय विधाते, प्रियांका उमेश गार्डी, अंकिता रामचंद्र लाडी व शुभांगी संदीप रासकर या महिला कर्मचारी मुख्यालयासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध विभागांत सेवेत आहेत.

No comments