Breaking News

फलटणचा मानाचा गणपती "शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ" अध्यक्षपदी प्रितम (आबा) बेंद्रे

Pritam (Aba) Bendre appointed as the president of the respected Ganpati of Phaltan, "Shukrawar Peth Talim Ganeshotsav Mandal"

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० :- फलटण शहरातील सर्वात जुन्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दिनांक १४ रोजी यावर्षीच्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या विविध पदाच्या निवडीबाबत कार्यकर्त्याची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मागिल वर्षाच्या ताळेबंद मागील वर्षाचे खजिनदार बाळासाहेब भट्टड यांनी सादर केला. यानंतर यावर्षीच्या मंडळाच्या विविध पदासाठी निवडीची सूचना मागील वर्षीचे अध्यक्ष फिरोज आतार यांनी मांडली याचे अनुमोदन निलेश खानविलकर व श्रीकांत पालकर यांनी दिले. या बैठकीचे अध्यक्ष राहुल जगन्नाथ निंबाळकर यांनी सूचनेस मान्यता दिली.

    यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना नावे देण्याची सूचना बैठकीचे अध्यक्ष राहुल जगन्नाथ निंबाळकर यांनी केली असता अध्यक्ष पदासाठी फक्त प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा) हे एकच नाव घेण्यात आले. तर तीन उपाध्यक्ष पदासाठी नरेश पालकर, विजय पोतदार, सुमित मठपती, तीन सेक्रेटरी पदासाठी अमित कर्वे (बाप्पा), राजेंद्र चंद्रकांत कर्वे, हुजेफ मणेर व दोन खजिनदार पदासाठी बाळासाहेब रमाकांत भट्टड, राहुल जगन्नाथराव निंबाळकर (काका) यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments