ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑगस्ट २०२५ -
भारत आमुचा प्राण,
तिरंगा त्याची शान
या उक्तीप्रमाणे ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संभाजी गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ईश्वरतात्या गावडे ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री .संभाजी गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८वीतील व ९ वीतील विद्यार्थिनी सिद्धी आटोळे व दिया मिंड यांनी केले. इयत्ता ५वी, ६वी आणि ७ वीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , राज्यगीत , झेंडागीत उत्तम प्रकारे सादर केले. इयत्ता ७वी , ८वी आणि ९वीतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड परेड करून शिस्तीचे प्रतीक दर्शवले. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी एकजुटीचे प्रतीक म्हणून विविध कवायत प्रकार सादर केले .यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर यामध्ये इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांनी फिर भी दिल हे हिंदुस्थानी, ७वी,८वी,९वी,१०वी च्या विद्यार्थ्यांनी उरी थीम सादर करून उरी येथील शहीद जवानांना मानवंदना दिली तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपत उत्तम प्रकारे झांजपथक सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी ,सोशल मीडिया अशा विविध विषयांवर भाषणे करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे,संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व सहायक प्रादेशिक परिवहन आधिकारी श्री संभाजी गावडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता नववीतील विद्याथीॅनी दिया मिंड हिने केले. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य केले.
No comments