महादेव जानकर यांनी घेतली ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांचे दि.१८ जुलै २०२५ रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्राध्यापक रमेश आढाव यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार कै.रमेश आढाव यांच्या पत्नी, मुलगा ऋषिकेश आढाव, सून, मुलगी जावई यांचे सांत्वन करत, त्यांना आधार दिला.
No comments