Breaking News

आरोग्य सेवकांचे साताऱ्यात हलगी बजाव आंदोलन ; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Health workers stage protest in Satara; March from Zilla Parishad to District Collector's Office

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑगस्ट २०२५ - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कंत्राटी तत्वावर च्या सुमारे 200 हून अधिक आरोग्य सेवकांनी कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी साताऱ्यात हलगी वाजवत मोर्चा काढला .या आंदोलनामध्ये 200 हून अधिक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

    आंदोलकांचे गेल्या पाच दिवसापासून कायमस्वरूपी शासकीय सेवेसाठी जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा विशेषता ग्रामीण भागातील आरोग्यसेवा पूर्णतःकोलमडली आहे त्यामुळे नागरिकांचे या आंदोलनामध्ये प्रचंड हाल होत आहेत येणारे चमचा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे मात्र योजना केंद्र सरकारच्या आकडेतील असल्यामुळे याबाबत निर्णय होताना विलंब होतो आहे त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीने आज आक्रमक पवित्रा घेतला त्यांनी सातारा जिल्हा परिषद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान मोठा मोर्चा काढला या मोर्चापेक्षा अडीचशे हुन अधिक आंदोलक सहभागी झाले होते तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले कर्मचाऱ्यांना नेहमीच शासन सेवेत समायोजन करून घ्यावे तसेच या कर्मचाऱ्यांचे बदली धोरण व वेतन वाढ निश्चित करावी या कर्मचाऱ्यांना आरोग्य अपघात विमा लागू करावा अशा विविध मागण्या निवेदनात सादर करण्यात आले आहे सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार हलगी वाजवत जोरदार आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले या कर्मचाऱ्यांनी निषेदाचे वेगवेगळे फलक जळगाव आपला संताप व्यक्त केला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले जिल्हाधिकारी कार्याच्या प्रवेशद्वारावर सुमारे एक तास हलगी बजाओ आंदोलन सुरू होते. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या आंदोलनाची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवून याबाबत मार्गदर्शन मागवली जाईल असे आश्वासन दिले आहे.

No comments