Breaking News

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (एस.एस.सी.) श्रेयस भोसले याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Shrimant Shivajiraje English Medium School (S.S.C.) Shreyas Bhosale selected for state level competition

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑगस्ट २०२५ - शाहू स्टेडियम सातारा येथे दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सातारा जिल्हा ॲमॅच्युअर  ॲथेलेटिक असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.सी.) च्या श्रेयस भोसले याने १६ वर्ष वयोगटात गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक आणि भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत, दिनांक 2 सप्टेंबर रोजी पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. श्रेयसला क्रीडा प्रशिक्षक सुहास कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    श्रेयस भोसले याने मिळवलेल्या यशाबद्दल  महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य अंजुम शेख व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

No comments